‘ चाबऱ्या ‘ भाग ४
पाखरांनी अकाशाला गवसणी घालुन पुन्हा खालच्या दिशेने झेप घेतली. एका मोठ्या वडाच्या फांदीवर त्यांनी आपले बस्तान मांडले. वडाच्या झाडाखाली गावचा एस टी थांबा होता. तिथेच रिक्षा आणि जिप सुद्धा थांबत. बाजार असल्यामुळे गाड्यांची ये जा सुरूच होती. जीप मध्ये वाजणारी गाणी ऐकायला मस्त वाटत होती. स्टँड ला लागुन असणाऱ्या हॉटेलात गावकरी बसलेले असत. एक मुलगा पाचही बोटांमध्ये ५ ग्लास पकडुन त्यांना चहा देत होता. ” अर्धाले बोटं घालतंय गिलासात… चहाला …