वश भाग ४
देशमुख आणि दिघे परिवाराचा लग्न सोहळा अतिशय दिमाखात साजरा झाला. शहरातल्या आठवणीत राहणाऱ्या सोहळ्यांपैकी एक. अरिहंत आणि शाल्मली दिमाखात विवाहबंधनात अडकले. वैभवाचे भरपूर प्रदर्शन करत दोन्ही कुटुंबांनी साजेसे लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. लग्नामध्ये साऱ्यांच्या नजरा अरिहंतपेक्षा शाल्मलीच्या व्यक्तिमत्त्वाकडे जास्त वळत होत्या. ती नखशिखांत अप्सरा दिसत होती. तिच्या उंच देहयष्टीला चापून बसलेली भरगच्च पैठणी आणि तिला साजेसा शृंगार प्रत्येक पुरुषाला अरिहंतच्या नशिबाचा हेवा करायला लावत होता. तिच्या अस्पर्श्य मखमली शरीराला …