गाव तसं चांगलं … भाग ७
अखेर विजयाने धनाजीशी लगट करत सरपंचाची खुर्ची मिळवली. गावात असलेला तात्यांचा मान लक्षात घेता त्यांना उपसरपंच बनवण्यात आले. विजयाच्या निवडीला फारसा विरोध तसा झाला नाही. वत्सला ह्यात आडकाठी करेल असं धनाजीला वाटत असताना देखील वत्सलाने उ का चू केली नाही. ह्याचेच धनाजीला आश्चर्य वाटले. विजयाला आपल्या त्यागाचे सार्थक झाल्याचा आनंद होता. आपले बहुमोल शील तिने त्या वासनांध आमदाराला देऊन जो …