सेवक – Part 4
दुसऱ्या दिवशी रविवार होता. पण तृप्तीला काय फरक पडणार होता. तरीही त्यादिवशी समीरने कधी नव्हे ते वेळ काढला आणि दोघे थोडी शॉपिंग करायला आणि आउटिंगला बाहेर गेले. समीरच्या सानिध्यात तृप्तीचा दिवस छानच गेला. संध्याकाळी काहीवेळ समीरचे कॉल्स चालले. पण त्यादिवशी जाणीवपूर्वक समीरने तृप्तीला वेळ दिला. तिलाही बरे वाटावे असाच त्याचा सद्हेतू होता. भुरेलाल नेहमीसारखा वागत होता. पण तृप्तीला काहीसे अस्वस्थ वाटत होते जेव्हा तो आसपास असायचा किंवा त्याच्याबरोबर बोलायची वेळ …