काही दिवसांपूर्वी मी fetish बद्दल एक पोस्ट लिहिली होती. तुमचे fetish काय, असा सवालही केला होता. संकोचामुळे अनेक जणांनी उत्तर दिले नाही, आणि ज्यांनी उत्तर दिले (बहुदा सारे पुरुषच!), त्यांनी त्यांना आवडणारी स्त्री कशी हवी, किंवा कामक्रिडेत कोणती पोझिशन आवडते, या संदर्भात लिहिले होते. Fetish जरी कामक्रिडेशी संबंधित असले तरी त्याची व्याप्ती मोठी आहे. केवळ व्यक्ती किंवा तिचे हावभाव हेच fetish मध्ये मोडत नसून निर्जीव वस्तू सुद्धा यात समाविष्ट असतात. शिवाय fetish अनुभवले की नेहेमी कामक्रीडेशी त्याचा संबंध जोडायला हवा असे नाही. सर्व fetish मध्ये एक समान धागा असतो; तो असा की, त्यातून मिळणाऱ्या आनंदाची तुलना कामक्रिडेतून मिळणाऱ्या आनंदाशी करू शकतो.
उदा. माझ्या एका जवळच्या मित्राला नवीन, कोऱ्या पुस्तकांचा वास अतिशय आवडतो. तसा तो बऱ्याच जणांना आवडतो. पण त्या वासाने मित्राला येणारा euphoria विलक्षण असतो.
अजून एक उदाहरण, माझे स्वतःचे, मी माझ्या मागच्या लेखात दिले होते. मला stiletto म्हणजे टोकदार उंच टाचांच्या बुटांचे fetish आहे.
फेटिश म्हणजे लैंगिक कल्पनेशी निगडित सजीव किंवा निर्जीव वस्तू. अनेकदा हावभाव, वागणे, बोलणे, चालणे किंवा इतर क्रियाही यात सामावल्या जाऊ शकतात. लैंगिक कल्पनाविलासात आनंद मिळवण्यासाठी या गोष्टींचा उपयोग होतो. बरेचदा या गोष्टी प्रवाहाविरुद्ध असतात. एखाद्याची एखादी fetish ऐकली तर, हा मनुष्य जरा चक्रम आहे, असे दुसऱ्याला वाटू शकते. कारण त्याच्या कल्पनेत दुसरी एखादी fetish असते. सांगायचा मुद्दा हा की, जर तुम्हाला कुणाची fetish, किंवा त्याचे आकर्षण कळले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नये. सुदैवाने, अलिकडच्या काही वर्षांत लैंगिक-सकारात्मकता वाढू लागली आहे. परिणामी, अनेक चमत्कारिक गोष्टी ‘स्वीकारण्यायोग्य’ होत आहेत. स्त्री पुरुष दोघांना काही ना काही fetish असू शकते. परंतु आपल्याकडे बहुतेक पुरुष प्रधान संस्कृती असल्याने स्त्रिया एकूणच या विषयावर व्यक्त होताना दिसत नाहीत.
असो, तर या लेखमालेत विविध fetish बद्दल लिहिण्याचा मानस आहे. वाचकांना तो पसंत पडेल, ही आशा!
आजचे fetish आहे Hand Partialism किंवा Cheirophilia म्हणजेच Hand Fetish (हस्त-आकर्षण)
Hand fetish म्हणजे हाताबद्दल असणारे लैंगिक आकर्षण. अर्थात काम क्रिडेत आलिंगन, हस्त मैथुन वगैरे करण्यासाठी हात वापरले जातातच. पण या fetish मध्ये हाताला जास्त महत्व असते. काही लोकांना हाताचा एखादा भाग बघत रहावा, त्याला स्पर्श करावा अशी तीव्र इच्छा असते. सर्वसाधारण पणे पुरुषांना स्त्रियांच्या नाजूक रेखीव हात आवडतात, आणि स्त्रियांना पुरुषाचे राकट, दणकट हात आकर्षित करतात. अगदी हाताचे एखादे किंवा सारी बोटे, नखांचा आकार, रंग इतक्या क्षुल्लक गोष्टीही उत्तेजीत करतात.
काही लोकांना हाताची हालचाल, विशिष्ट लकब आवडते. ती लैंगिक हालचाल करणारीच असावी, असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर बुटांची लेस बांधणे असो, की टेबल वर ठेका धरणे असो. या हालचालीत कोणतीही लैंगिक कृती नाही. तरीही ती बघण्यात आनंद वाटतो. त्यातून काही कामसूचक असेल (उदा. बोटांनी योनी अथवा लिंगाची आकृती करणे) तर त्यातून विशेष उत्तेजना मिळते.
अजून काही उदाहरणे नमूद करायची झालीच तर, अंगठीशी चाळा करणारी बोटे, घड्याळ किंवा ब्रेसलेट, बांगड्या घातलेले मनगट, बोटांनी चुटकी वाजवणे, बोटे मोडणे, यापैकी एक किंवा अनेक आकर्षणाची कारणे होऊ शकतात.
Hand fetish तसे कमी आढळते. हे fetish असलेल्या सर्व व्यक्ती त्या हाताला स्पर्श करतीलच असे नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे हाताची हालचाल त्यांना मोहक वाटते. बरेचदा hand fetish आवडत्या व्यक्तीची आठवण करून देते. त्यामुळे प्रत्येकवेळी त्याला लैंगिक अर्थ असतोच असे नाही.
जर तुम्हाला hand fetish असेल तर तुम्ही काही गोष्टी करून पाहू शकता.
१. आपल्या जोडीदाराच्या हातांचे, वेगवेगळ्या हालचालींचे फोटो किंवा व्हिडीओ काढू शकता. तुम्ही एकटे असताना त्यांचा उपयोग उतेजना वाढवण्यासाठी करू शकता
२. जोडीदारासोबत प्रणयाराधन करताना हात आणि बोटांचा जास्त उपयोग करू शकता, किंवा त्याला/तिला करायला सांगू शकता.
३. जोडीदाराच्या हाताचे, बोटाचे चुंबन घेणे, त्यांना चोखणे करू शकता
४. पूर्ण मैथुन करण्या ऐवजी कधी कधी जोडीदाराकडून हस्तमैथुन करून घेऊ शकता, किंवा तिला/त्याला हस्त मैथुन करताना बघू शकता. त्यावेळी त्यांचे हात, बोटे स्वतः च्या किंवा तुमच्या शरीरावर कशी फिरतात, हे बघूनही उत्तेजनेचा आनंद वाढतो.
Fetish चा आनंद घेणे पूर्ण तसे सोपे असते. पण जर जोडीदाराला स्पर्श करणे किंवा त्याने/तिने स्पर्श करणे अपेक्षित असेल, तर जोडीदाराशी प्रथम चर्चा करणे इष्ट. त्यातून नवनवीन कल्पना सुचतात आणि एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात.
वाचाकांपैकी कुणाला hand fetish असेल तर तुमचे मत, अनुभव वाचायला नक्की आवडेल. त्यामुळे नुसते दाखवून पुढे जाऊ नका. वाचकांचे अभिप्राय हा लेखकांचा fetishच असतो!
©आदि