॥ चाळीशी नंतरचे कामजीवन ॥ Sex Lifer After 40+ in Marathi

मला वैयक्तिक मॅसेज वर अनेकांनी अनेकदा हा प्रश्न अनेकदा विचारलाय की चाळीशी नंतरचे कामजीवन याविषयी आपण सविस्तरपणे लिहा, चला तर मग आपण यावर अनुभवसंपन्न चर्चा करुयात.

मी सहजीवन कामजीवन याविषयीचा उत्तम अभ्यासक असून अनेक तज्ञ डॉक्टरांच्या नित्य सहवासात राहिल्याने याविषयी सविस्तरपणे व अभ्यासकतेने सदरचा लेख लिहीत आहे.

खरंतर आपण सध्या कॉमनली डिप्रेशन एन्झायटी मानसिक ताणतणाव हे शब्द सतत ऐकत असतो. माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितल्याप्रमाणे सध्या डिप्रेशनचे पेशंट खूप वाढलेत व डिप्रेशनच्या गोळ्या खाणारे अनेक जण आपल्याला आपल्या जवळपास दिसतील. म्हणून मी खात्रीने सांगेल की पुढील १० वर्षात या आजारांनी ग्रसित जगात सार्वाधिक पेशंट आपल्या देशात असतील. याच मुख्य कारण निरामय व आनंदी कामजीवनाचा अभाव आणि शारीरिक व मानसिक सुरक्षिततेची कमतरता हेच असेल. उत्तम कामजीवनाने शरीरातला हार्मोनल व न्यूरोकेमिकल बॅलन्स उत्तम राहतो. उत्तम कामजीवन हे आत्मसम्मान, आत्मप्रतिमा व सेल्फ कॉन्फिडन्स यासाठी सर्वोत्तम असते.

खरंतर संपन्न कामजीवन / सहजीवन किवां उस्फूर्त संभोग हा वैवाहिक जीवनाच्या शाश्वत सक्सेसचा एक अनुठा अविभाज्य भाग आहे़. उत्तम कामजीवनाने फक्त वैवाहिक जीवनच सफल सुफल होत का? तर हो ते 100% होतेच होते परंतु त्या सोबत मेंटल पीस, शारीरिक समाधान, उत्तम व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली, तसेच उत्तम झोप असे अनेक फायदे परिपुर्ण संभोगामुळे होत असतात. उत्तम संभोग करणारी जोडपी कठीणातील कठीण काळातही एकमेकांची साथ सोडत नाहीत उलट धैर्याने परिस्थितीला सामोरे जातात व संकटाचा सामना करतात आणि जिंकतात सुध्दा. याउलट संभोगात अतृप्त असणारी जोडपी कितीही सुबत्ता असली तरी आपली संभोग भूक भागवण्यासाठी त्रयस्त जोडीदार शोधत असतात व एकमेकांची इज्जत अभावानेच करत असतात.

साधारण लग्नाआधी चोरून लपून वेळेअभावी पटकन उरकुन केलेला संभोग, अपुरा अभ्यास, पॉर्नफिल्म्सचे अवास्तव पाहणं, मित्रमंडळीचे भ्रामक व कल्पनारंजन मधून मिळालेले चुकीचे सल्ले यामुळे लग्नानंतर खरा सेक्स होतच नाही. मग त्यातून न्यूनगंड तयार होणे, आपलं लिंग योग्य साईजचे आहे़ काय अथवा ते छोट की मोठं आहे, आपल्याला सेक्स जमला का नाही आपलं तर लगेचच स्खलन झालंय मग लोकं म्हणतात आम्हांला अर्धा ते एक तास लागतो. या भ्रामक जंजाळात माणुस अडकतो अनं मनातल्या मनात आपला कॉन्फिडन्स हरवून बसतो. या परिस्थितीला जबाबदार असतो बऱ्याच जणांचा विवाहपूर्व केलेला आधा अधुरा चोरून लपून केलेला संभोग हैदोस सारखी अतिरंजित मासिकांचे वाचन व मोबाईल वरील सहज उपलब्ध असलेल्या पॉर्न फिल्म्स भडिमार आणि मित्रांचा काल्पनिक व अवास्तव भ्रामक सल्ला हा त्यांचा कॉन्फिडेन्स घालवण्यास कारणीभूत ठरतो.

Other Stories..  आयुष्यातल्या काही सुंदर व बेधुंद क्षणांचे शब्दांकन -Marathi Romantic sexy story

विवाहानंतर सुरू झालेली प्रणयक्रीडा व संभोग हा दोघेही जोडीदार सेक्सचा अनुभव नसलेले असतील पण थोडे बोल्ड बिनधास्त अनं समजुन घेणारे असतील तर हळूहळू प्रयोगातून व आलेल्या अनुभवातून त्यांचा सेक्स योग्य वळणावर जाऊ शकतो.

परंतु विवाहपूर्व सेक्स केलेला एखादा जोडीदार असेल अनं दुसरा एकदम नवखा असेल तर तो किंवा ती आपल्या पहिल्या जोडीदाराची तुलना करून तिला त्याला पहिल्यापेक्षा जास्त प्लेझर मिळत नसेल तर ते अतृप्त फिलिंग अनुभवतात व ते एकमेकांना म्हणावी तशी साथ देत नाही अथवा सहकार्य करत नाही. या केसेस मध्ये पुरुष जर डॉमिनेंट असेल, समंजस नसेल, केअरिंग नसेल, पुरुषी अहंकार असलेला असेल अनं तिच्या भावना व मन समजुन घेणारा नसेल तर त्यांच्यात दुरावा खुप वाढत जातो.

याऊलट पुरुष जर समंजस प्रेमळ असेल तर पुरुषांची सेक्स कमजोरी ही समंजस स्रीच्या आश्वासक साथीने दूर होऊन ती समाधानी संभोगापर्यंत नक्कीच पोहचू शकते. परंतु प्रेम काळजी आपुलकी जर पुरुषाच्या वागण्या बोलण्यात असेल तर त्याची स्री कमजोर पुरुषांमध्येही पुन्हा संभोगासाठी कॉन्फिडेन्स तयार करून सहजीवन बहरवू शकते.

—- आता आपण चाळिशीनंतरचे सहजीवन पाहू. .. .. .. .. !!

वरील पार्श्वभूमी सांगायचं कारण जर वैवाहिक जीवनाचा पायाच चाळीशीपर्यंत कमजोर असेल तर चाळीशीनंतरचे ज्ञान पाजाळून फायदा नाही.

नित्य तन मन गात्र सुखावणारा संभोग होत असेल तर अशी जोडपी खुप आनंदी व निरोगी असतात. त्यांना व्यायाम, योगा, फिटनेस, स्वच्छ नीटनेटके राहावे असे आपोआप वाटते. उत्तम संभोग करणारी स्री अथवा पुरुष अतिशय स्मार्टपणे स्वतःला समाजापुढे प्रेझेंट करतात व आपापल्या कामात नेहमीच बेस्ट देतात हे शाश्वत सत्य व खरं आहे़. उलट अतृप्त जोडपी चिडचिड, तन व मनाने आजारी, प्रेझेंटेबल न राहणे, कामात लक्ष नसणे, दुसऱ्याचा द्वेष करणे या गोष्टीची शिकार झालेली आढळतात.

Other Stories..  संभोगाच्या नाना तऱ्हा परि ही असे एक !

म्हणून उत्तम संभोगा साठी प्रेम, जिव्हाळा, काळजी, आपुलकी ही चतुसृती यशस्वी वैवाहिक सहजीवनाची गुरुकिल्ली असते हे ध्यानात घ्या. खरंतर पैसा संपत्ती अत्याधुनिक सुविधा थोड्या कमी असतील तरीही उत्तम संभोगी जोडपी कायम सुखात असतात. त्यांच्यातील वादंग हे पेल्यातील भांडणे ठरतात.

परिपूर्ण व भरभरून संभोगी जोडपी जोडीदार वेळेवर जेवायला आला नाही, एखादा थोडा आजारी असला तरी अशी जोडपी स्वतः पेक्षाही जोडीदाराची जास्त काळजी घेणारी असतात. अशी जोडपी कठीण परिस्थितीमध्ये डिमांड न करता उलट आपली जमापुंजी सहज काढून देणारी व स्वतः बरोबर जोडीदाराला कायम आनंदी पाहण्याची इच्छा बाळगून असतात. पण खेदाने सांगावं लागतंय आपल्या समाजात हे सुख फक्त 20% जोडपीच घेतात बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेले बरे.

मित्रहो नित्य संभोग हा निरोगी काया आणि मानसिक व शारीरिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कोणतीही स्री ही वयाच्या 30-45 या वयामध्ये पूर्णतः संभोग सुखाला आसुसलेली असते. कारण मुलं थोडी मोठी झालेली असतात जबाबदाऱ्या थोड्या कमी होतात सेक्स बाबत नॉलेज अपडेट असलेल्या असतात. कौटुंबिक बऱ्यापैकी आर्थिक स्थिरता आलेली असते. मानसिक परिपक्वता आलेली असते यांमुळे ती सेक्स साठी जास्त सक्रिय असते. पुरुषांनी या गोष्टींचा विचार करून आपल्या सखीला पुरेसा वेळ दिला पाहिजे.

स्री ही नित्य कामात असल्याने तीची सतत हालचाल होत असल्यानं तिचा बऱ्यापैकी शारीरिक व्यायाम होत असतो मात्र पुरुष जर आळशी असेल व्यायामाचा अभाव असेल पोट व वजन वाढलेलं असेल तर सेक्स साठी लागणारी ऊर्जा त्याच्याकडे अपुरी पडते. त्यामुळे स्त्री समाधानी होत नाही. पुरुष एकदा स्खलीत झाला की गार पडतो मात्र स्रीही मल्टिपल स्खलनाची दैवी देणगी असलेली असते म्हणून पुरुषाने हे समजुन घेतलं पाहिजे की आपला बार उडायच्या आधी स्रीला किमान एकदा ऑरगॅझम पर्यंत घेवुन गेलंच पाहिजे. फोरप्लेच्या माध्यमातून स्रीला लिंग योनीत न घालताही स्खलीत करता येते हे मी माझ्या मागील पोस्ट मध्ये खुप सविस्तरपणे लिहिलेले आहे़.

Other Stories..  शेजारचा म्हातारा..

मित्रहो चाळिशीनंतर आपणांस फिटनेसचे वेड लागायला पाहिजे आपण जर फिट असु तरच आपण उत्तम संभोग करू शकू. जर तुम्हांला सहमतीने दररोज सेक्सची सवय असेल तर ती फ्रीक्वेन्सी काळजीपूर्वक जतन करा. मात्र जोडीदाराने एखादया दिवशी जर सांगितलं की आज नको सकाळी करू उद्या करू तर तिचा त्याचा रिस्पेक्ट ठेवा जबरदस्ती करू नका.

रोज सेक्स होत असेल तर सोन्याहून पिवळं पण आठवड्यातून किमान तीन वेळा उत्तम संभोग होण हे सहजीवना साठी खुप आवश्यक आहे़.

सेक्स साठी वयाची अट नसते दोघेही फिट असतील व परस्परांत स्नेह प्रेम असेल तर आयुष्याच्या शेवटपर्यंत उत्तम संभोग होतो हे खरं आहे. उत्तम कामजीवनासाठी व्यायाम आहार खुप महत्वाचा आहे़. आर्थिक व वर्क फ्रीडम असलेली कितीतरी प्रेमळ जोडपी सत्तरी ऐंशीतही कपल टूर करतात व मनसोक्त एकांत व संभोग एंजॉय करतात. हे फक्त नित्य सेक्समधून आलेल्या फिटनेस मुळेच शक्य असतं हेही खरं. फ्रेंड्स नित्य व मनसोक्त संभोग हा तुम्हांला व तुमच्या जोडीदाराला फिट ठेवण्यासाठी उद्युक्त करणारा रामबाण उपाय आहे़

चाळीशीनंतर सेक्सलाईफ़ हे वयोमानानुसार संपन्न अनुभवाच्या शिदोरीवर उत्तम हवं वर सांगितल्याप्रमाणे रोज एकदा होत असेल तर सोने पे सुहागा पण ते नसेल तर किमान हप्त्यात तीन वेळा नक्की संभोग करा. हे होण्यासाठी वैवाहिक पाया भक्कम करा फ्रॉम बिगिनिंग पासून हे नात बहरत ठेवा अनं तुम्ही नित्य संभोग करत असाल तर तुम्हांला फिटनेसचे वेड लागतेच सोबत स्वच्छ सुंदर व टापटीप राहण्याला तुम्ही आपोआप प्राधान्य देता ….. मित्रहो शेवटी वय हे फक्त नंबर असतो त्याला आपल्या कामजीवनात व सहजीवनात एंट्री देऊ नका …… अभी तो मैं जवान हूँ हे कधीच विसरू नका आणि आनंदी रहा फिट रहा संभोग करत रहा सुख सौख्य तुमच्या पायाशी लोळण घालेल हे अनुभव संपन्न बोल आहेत.

— धन्यवाद

3/5 - (6 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!