वश भाग १
टीप – सदर कथा कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला उत्तेजन देण्यासाठी लिहिली गेली नाहीये. शिवाय कथेमध्ये लिहिले गेलेले स्थळ, काळ आणि व्यक्ती वर्णने हि काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजण्यात यावा आणि तोंडात (स्वतःच्या) बोटे घालून आश्चर्य व्यक्त केले जावे. ****** नरहरी पंडित सडकेवरून भरभर चालले होते. तळपणाऱ्या सूर्यापेक्षाही त्यांच्या केशविरहित डोक्यामध्ये प्रचंड आग भरली होती. त्या आगीसमोर सूर्याचा दाह शीतल वाटावा इतकी ती तप्त होती. आजवर भूक, …