‘ चाबऱ्या ‘ भाग ३

” माss यचा किडा वासला व्हरावं याच्याsss….. आरं धरा धरा धरा…. चोरs …चोरs …चोरs चोरs….”

आवाजाने गर्दितल्या सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.

” घे लस्सुन…”

” अय चाराण्याला किलू, चाराण्याला किलु… लालय लालय… तंबाटे लालयंsss…”

” आंबा रुप्पाय डझन…आंबा रुप्पाय डझन…”

असा सर्व गोंगाट सुरू होता गावच्या आठवडी बाजारात…

सकाळपेक्षा दुपारच्या कडक उन्हात देखिल लोकं बाजार करायला जास्त येत. सायंकाळ होईपर्यंत कमी भावात सुध्दा माल विकला जायचा, म्हणुन त्या वेळी जास्त लोकं येत. शेजारच्या १०-१५ किलोमीटर अंतरातील गावचे लोक बाजार करण्यासाठी साठी येत. त्यामुळे तेथे गर्दी वाढते रूप घेत होती.

अशातच डोक्यावर लालभडक रंगाचा फेटा, अंगावर मळकट बंडी आणि धोतर नेसलेल्या वयस्कर माणसाच्या आवाजाने सगळे दचकले. ” चोर.. चोर” या आवाजाच्या दिशेने लक्ष जाताच असे दिसले की , एक पांढरा शर्ट, खाकी चड्डी घातलेला शाळकरी मुलगा गर्दीतून वाट काढत पळत आहे, नी मागुन तोच वयस्कर माणुस त्याचा पाठलाग करत आहे.

तेवढ्यात त्याच्या पायांमध्ये कोणीतरी कोबी फेकुन मारली तसा तो अडखळत धडपडला. त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. जोरात पडल्यामुळे ‘धप्प ‘ आवाज आला. तो विव्हळला..भानावर येण्या आधीच त्याच्या कॉलर ला मागुन कोणी तरी पकडुन त्याला जोरात ओढले, ” अय शहाण्या, चोरी करतो व्हय रं ? ” हा आवाज मुलीचा होता.

तिनेच तो पळत असताना त्याच्या पायात कोबी फेकल्याने तो पडला व पकडला गेला.

” हाना ह्यालाssss ..” म्हणत लोकं त्याला मारण्यासाठी पुढे सरसावले.

” थांबाss.. कुनी बी हात लाऊ नगा…”

मुलीच्या ओरडण्याने सगळे थांबले.

” आगं .. पर ह्यो तर चोर हाय की गं पोरी..” एक जण बोलला.

” आधी बगु तर द्या…. काय चोरलंय ती …” ती बोलली.
” ह्यानी बटवा चोरीलाय पैश्याचा मह्या…” लाल फेटेवाल्या वयस्कर माणसाने दात ओठ खातच त्याच्याकडे धाव घेतली, त्याच्या खिशातून बटवा काढला, त्याला मारण्यासाठी हात उगारताच मुलीने त्यांनाही रोखले. ” आजोबा थांबा… मारू नगा व..”

” आनं… ! का गं अडवतियास…? “….

” आवं, पडल्यामुळं का कमी लागलंय व्हय त्याला…? अंगाची काठी हाय नुसती… मारलं तर जीव सोडल की…”

” मग काय असाच जाऊ द्यायचा व्हय गं? ” गर्दीतून एक जण मोठे डोळे करत बोलला.

” न्हाय न्हाय… धुडगूस घातलाय ह्या चोरट्यांनी… आज घावलाय ह्यो एक… ह्याला कह्याला सोडायचा….? ” गर्दीतून दुसराही एक जण रागात पुढे आला .

तिने मुलाकडे पाहिले.. कॉलर सोडली, ” कश्यापायी चोरलंस रं पैसं..? “

मुलगा खुप घाबरलेला होता, ” म्या चोर न्हाय….. चोर न्हाय म्या..Ss…” बिथरला होता तो.

” मंग ह्यो बटवा काय म्या टाकला व्हय तुझ्या खिशात? ” मुलगी थोडी रागातच बोलली.

” न्हाय तायडे… आईनं मला बाजार कराय धाडलंय… माजी लाहानी भईन, तिला रातपळण्यात बसाय लई आवडतय, म्हणुन तिला बी संगती आणलंय…”

तो मुलगा बाहेरच्या दिशेने बघत आवंढा गिळत बोलु लागला.

” मंग कुठंय रं ती.. तिला बी चोरी कराय धाडलं का काय? ” एका बाईने आश्चर्याने हनुवटीला हात लावतच विचारले.

तो उत्तरला, ” न्हाय वं… ती पलीकडं आमराई हाय का बगा… तिकडं … चार पाच माणसांनी तिला नेलंय उचलुन…तिला चाकु लावलाय वंss …” असं म्हणताच त्याचा हुंदका निघाला….

सगळे अवाक झाले. त्या मुलीने त्याला सावरत विचारले, ” कुठंशी हाय ते? “

” आमराईत हायत…. माजं….. बाजारचं पैसं बी घितल्यात त्यांनी… मला म्हणल्यात….आणखीन घीउन आलास तरच सोडील भईनिला… कुणाला जर का काय बी सांगितलं, तर हिला जित्ती ठीवनार न्हाय म्हनल्यात.. म्हनुन पैश्यासाठी चोरी केली …”

त्याचं रडु थांबत नव्हतं.

ती मुलगी तडक त्या आमराई कडे धावु लागली. तिच्या मागेच लोकांची पावलं देखिल वेगाने बाजारा बाहेरच्या रस्त्याला लागुन असणाऱ्या आमराई कडे गेली.

तिथे आतमध्ये एका झाडाखाली चार पाच गावगुंड लोकांची टोळी जुगार खेळत बसली होती.. बाजुला छोटी मुलगी रडत थांबलेली होती.

कोबी फेकलेल्या मुलीने पळत जाऊन एकाला पाठीत जोरात लाथ मारली. अचानक झालेल्या प्रहाराने तो माणूस विव्हळला…

” आयोव ssss “

एक जण उभा राहिला, मुलीने क्षणात त्याच्या कानशिलात लगावली. तिचे रौद्र रूप पाहून तो पळू लागला…तेव्हढ्यात तिने त्याला मागुन जोरात ढकलले तसा तो खाली पडला.

लोकांनी त्या सर्वांची येथेच्छ धुलाई सुरू केली. रडत असलेली मुलगी भावाला बघुन आणखी रडू लागली व पळत त्याच्याकडे गेली.

त्या मुलाला आता तिला सुखरूप पाहुन हायसे वाटु लागले…

नेमकी पोलिसांची जीप तिथून जात होती. माजलेला गदारोळ पाहून ते तिथे आले. तसे सर्व वातावरणच शांत झाले. लोकांनी घडला प्रकार त्यांना सांगितला. जिच्या धाडसामुळे हे गुंड पकडले गेले, तिच्याकडे पाहत पोलीस म्हणाले,

” शाब्बास बेटा, धाडसी आहेस. कित्येक दिवस फरार असलेले हे कुख्यात गुंड आहेत.. आज तुझ्यामुळे पकडले गेलेत..” असे म्हणुन ते गुंडांना ताब्यात घेऊन निघुन गेले.

सर्व लोक त्या मुलीचं कौतुक करू लागले.

ज्यांचा बटवा चोरी गेलेला, ते गृहस्थ तिच्या जवळ आले.

कौतुकाने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, ” त्या पोराला मारू न्हाय दिलं तॉ.. अन् त्या गुंडास्नी बी तॉच लाथ घातलीस… चांगली बी हाईस अन् वाईटासाठी वाईट हाईस बग…. कुनाची गं तु? आनं गाव कोंच तुहं ?”

ती मुलगी बोलण्याआधीच लोकांमधून एका मुलीचा आवाज आला, ” कंचं म्हंजी…! आमच्या धवन्याची हाय ती… सुवर्नी..”

आणखी एका मुलीचा आवाज आला, “आनं.. गुनाची तर असनारच की… सुशालाबाई ची मया अन् सुभानरावांची खमक चांगलीच भरलीया हिच्यात. “

तिच्या मैत्रिणी होत्या त्या. सोबत आलेल्या. चेहऱ्यावर आनंद उमटला होता त्यांच्या.

सगळे कुतुहलानेच पाहू लागले आता. गावात बाजार करणारे विक्रेते लगेच म्हणाले, ” पोरी, तु आज जेव्हढा बाजार भरशील, त्याचा कुनिबी रुप्पाया सुध्दा न्हाय घेणार आज.”

” न्हाय न्हाय… असं फुकाट न्हाय घेनार बरं.. जी काय होईल ती पैसं घ्या…” सुवर्णा म्हणाली.

” न्हाई…. कुनीच न्हाय घेनार… आता ठरलं म्हंजी ठरलं..” सगळे म्हणाले. तसं तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.

ती त्या बहीण भावंडांकडे गेली. लहान मुलीला कडेवर घेतले व तिला गोंजारत गोंजारत गावकऱ्यांना म्हणाली, ” खरी गरज तर ह्यांना हाय.. ह्याचं तर सगळंच पैसं नेलं की ओ त्या गुंडांनी.. माज्यापरास ह्यांनाच बाजार द्या आज….”

सुवर्णाचा एवढा चांगला स्वभाव बघुन सगळ्यांना खुप कौतुक वाटु लागले. त्या मुलाचा चेहरा देखिल गहिवरून खुलला होता.

कडेवर असणाऱ्या चिमुकलीने सुवर्णाच्या गालाचा अलगद पापु घेतला. सगळे हसु लागले.



” आंग आस्स… पोटभर खा माय…” सुधामती भर दुपारी उन्हाची लाही लाही असताना पण चुल पेटवुन भाकऱ्या थापत होती. चाबऱ्या चवीनं खात होता. पण त्याचं लक्ष सतत फटकाकडे जात होते.

” २ भाकऱ्या जास्तच टाकते बग.. गोदीला आज बरं न्हाय.. म्हनून सगळं बनवुन ठीवलंय … तुला कालवण वाढु का अजुन? “

सुधामतीने कढईत केलेले बटाट्याचे कालवण पळीने त्याच्या पुढे केले. चाबऱ्याने, ” पोट भरलं काकी.. नगं‌ आता बास…” म्हंटले व पुन्हा फाटकाकडे टक लावुन पाहत बसला.

” आरं ईल गोदी.. तिला आंडी मिळली नस्त्याल…” सुधामतीने त्याची मनस्थिती जाणली होती.

” लई वाडूळ झालं गं तिला जाऊन काकी… अजुन न्हाय आली..जाऊन बगुन येऊ का? ” चाबऱ्याला आईची काळजी वाटतेय हे पाहुन सुधामतीला त्याचं नवलंच वाटलं.

” केवढुसा हायस… पर आईवर लय मया हाय तुजी.. आरं ईल ती.. काळजी नगं करुस…” सुधामतीने असे म्हणताच चाबऱ्याला थोडं बरं वाटलं. त्याने जेवण झाल्यामुळे हात धुतला व शाळेची पिशवी आणायला आत गेला.

” आईला… इसरलोच… हॅहॅहॅss… पिशवी तर शाळेतनं आल्या आल्या फाटकाच्या बाहेर लटकवली होती..”

असं बोलत त्याने ती पिशवी आणली. त्यातले पुस्तक काढून तो वाचन करु लागला.

” शिकुन लय मोठा व्हचील रं बाबा… लय शिक अन् लय मोठा हू..”

सुधामती त्याच्याकडे पाहतच बोलली. सगळा स्वयंपाक करुन तिने सगळं आवरून ठेवले.

” जाते रं चाबऱ्या.. कुठं भाहेर जाऊ नगंस .. ईल गोदी…”

तिने सुध्दा जाता जाता तोच विचार केला.

” गोदा अजुन आली का नसंल बरं..?… प्च… तबेत बरी न्हाय तरी उन्हाचं भाईर गेलीया …” विचार करतंच तिने थेट घराकडची वाट धरली.

तिकडे एका प्रतिष्ठित घरात माञ सुशाला नावाच्या प्रतिष्ठित स्त्रीने, चुकलेल्या वाटेवर अनवाणी पाऊले टाकलेली होती.

ते पाहून गोदाचे हाल बेहाल झाले होते. झोपलेल्या बबनच्या ताठरलेल्या अंगाकडे तिचे लक्ष खिळून बसले होते. तो जसा जसा वर सरकत होता.. तसा गोदाचा हात देखिल तिच्या सर्वांगावर फिरत होता. तिच्या श्वासांना उबदारपणा येऊ लागला. ती भिंतीला घट्ट खेटून उभी राहिली. तिकडे बबन आणि सुशाला चुंबन घेण्यात मग्न होते. त्यांच्यात एकमेकांना सामावुन घेण्याची चढाओढ लागली होती. उसासे, श्वास, धापा, बांगड्या, पैंजण, यांच्या आवाजात आता बाजेचा ‘चर्र चर्र’ आवाज सुद्धा ऐकु येऊ लागला.

अचानक सुशालाचे लक्ष समोरच्या खुंटीवर पडले. त्यावर सुभानरावांचा सदरा अडकवलेला होता. क्षणात सुशाला भानावर आली.

” अय बबन्याss… ऊठ ऊठ ऊठ लवकरss… आरं सुभानराव येत्याल की… ह्सssss… ” सुशाला उठु लागली.

बबनने तिला पुन्हा स्वतः वर ओढले,

” हे एव्हढं झालं की जातु..” म्हणाला व तिच्या डोक्याला धरून तिचे ओठ स्वतःच्या ओठांवर ठेवले. दोघे चुंबन घेण्यात पुन्हा मग्न झाले. बबनने दोन्ही हात तिच्या घामाने ओल्या झालेल्या गोल गोल चिंब नितंबावर ठेवले आणि हळुवारपणे दाबु लागला. त्यामुळे तिच्या अंगात कंपन झाले व ती, ” आहह्सस……” किंचाळली.

जोराच्या आवाजामुळे गोठ्याच्या छताच्या आडव्या मेढीवर सावलीत बसलेल्या कावळ्यांनी फडफड करत आकाशाकडे झेप घेतली.

____________________________________________

भाग ३ पुर्ण.

4/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!