मास्तर भाग 1
उजव्या अंगठ्याचे नख तुटून त्यातून भयानक कळ आणि सोबत रक्त जात होते. थंडीची रात्र असल्यामुळे ठणका जरा जास्तच जाणवत होता. ती काही कळ येण्याची एकच जागा नव्हती अंगावर, कमरेमध्ये, हनुवटीवर, गुढगा, खांदे. सगळे सगळे काही ठणकत होते. एक दातही पडला होता. तोंडातून वाहिलेले रक्त खुरट्या दाढीतून ओघळताना सुकले होते. कपडे धुळीनं चिखलाने माखले होते. गालफाड, कपाळ, कानशिले सगळे काही माराने …