उष्ण उसासे आणि पैंजणांची किणकिण या आवाजांनी ती रूम परत एकदा भरून गेली होती. संध्याकाळच्या उन्हाची तिरीप त्या बेडरूमच्या खिडकीच्या फटीतून सरळ येऊन रंगाच्या हलणाऱ्या पार्श्वभागावर पडली होती. रंगाने त्यादिवशीचा तिसरा प्रणय पल्लवीसोबत सुरु केला होता. पल्लवीच्या मांड्यानी रंगाच्या कमरेला विळखा घातला होता. त्याची जीभ तिच्या तोंडामध्ये रसग्रहण करण्यात मग्न होती. तिचे हात त्याच्या कमरेपासून पाठीपर्यंत सगळीकडे फिरत होते. मधेच चुंबनांमध्ये विश्रांती घेत दोघे मोठा श्वास घेत होते. पल्लवी त्याच्या लिंगाच्या धक्क्यांनी परत परत झडत होती. पण तरीही ती त्याला थांबवत नव्हती. तिला आजवर अंधारात कसलीही जाणीव नसलेलं फसवं लैंगिक सुख मिळालं होत. ज्याला थोडीही चव नव्हती. तिला प्रणय नीटसा कळलाच नव्हता. आज रंगाने तिला धमकावून का होईना पण खरे रांगडे लैंगिक समाधान मिळवून दिले होते.
त्याचे लिंग तिचा नग्न देह पाहताच स्खलन होऊनसुद्धा १५-२० मिनिटांमध्ये परत तयार होत होते. तिसऱ्यांदा जवळजवळ ४० मिनिटे रंगा तिला कचकवत होता. तिच्या घट्ट ओल्या मखमली योनीला त्याच्या लिंगाने भुरळ घातली होती. त्याला वाटलेच नव्हते कि पल्लवी कुवार असेल. त्याने तिचा कौमार्य भंग केला हे तिच्या योनीतुन पहिल्यावेळी आलेल्या रक्तामुळेच त्याला ठाऊक झाले होते. पल्लवीचा नवरा तिला भोगण्यात असमर्थ आहे हे त्याला कळले होते. तेव्हा आता आपण हवे तेव्हा हवे तेवढे सुख ह्या मादक मादीकडून मिळवू शकतो ह्या आनंदाने त्याला सतत कामलहरींचे भरते येत होते. पल्लवी पण त्याच्या गतीला साजेशी हालत प्रतिसाद देत होती. दोघांच्या हल्ण्याने तो पलंग चांगलाच करकरत होता. पल्लवीच्या कामरसाने खाली बेडशीट ओळीचिप्प झाली होती. अजून एक पाच-सात मिनिटे पल्लवीच्या योनीमध्ये काढघाल करता करता रंगा स्खलनाची लक्षणे दाखवू लागला. पल्लवीला पुन्हा एकदा त्याच्या गरम पिचकाऱ्यांची आस लागली होती. आपल्या सुपीक गर्भाला बीजाची गरज आहे आणि शरदचे बीज आपल्यात रुजू शकत नाही हे तिला पक्के ठाऊक झाले होते. तिने दोन्ही हातानी त्याची कंबर दाबून धरली. रंगा तिच्या योनीमध्ये धारातिर्थी पडू लागला. पल्लवीपण कमरेची लवलवती हालचाल करत हलकेसे स्खलन अनुभवू लागली.
त्याच्या लिंगातून पडणारे सर्व वीर्य तिला गर्भार करण्याच्या लायकीचे होते. रंगाने तिच्या तोंडात तोंड घालत आपले स्खलन पूर्ण केले. त्याच्यावरची पल्लवीची पकड ढिल्ली झाली. तिने पाय पसरले. रंगाचे लिंग आकुंचन पावत जात तिच्या योनीमधून बाहेर आले. तिच्या योनीतुन वीर्याचा ओघळ निघून गादी भिजवत गेला. रंगाला आज भरपूर झाले होते. तो धापा टाकून झाल्यावर उठला. तसाच नग्न तिथून बाहेर निघून गेला. पल्लवी तशीच पडली होती. तिलापण खूप दमायला झाले होते. पण अति कामसुखाने मनाला परिपूर्ण समाधान लाभले होते. ती खुश होती. तिने उठून स्वतःची पॅंटी आणि ब्रा चढवली. परकर घालत असताना रंगा कपडे चढवून परत आला.
“उद्या शाळेत डबा घेतो.” पल्लवीच्या अर्धनग्न कायेकडे नजर टाकत तो म्हणाला. तिने पटकन परकर छातीपाशी धरला.
आत्ताच त्याच्या शरीराला घट्ट बिलगून त्याच्या वीर्याला स्वतःमध्ये सामावून घेणारी पल्लवी अशाप्रकारे लाजत आहे हे पाहून त्याला हसायला आले. तिने फक्त मान डोलावली. रंगा निघून गेला.
शरदला यायला अजून खूप वेळ होता. गरम पाण्याचं गिझर चालू करू जबरदस्त प्रणयाच्या भक्षी पडलेल्या कोमल देहाला पल्लवी शेक देऊ लागली. तिची योनी गरम पाण्याच्या शेकाने चांगलीच सुखावली. तिला तिथे थोडी सूजपण आली होती. रंगाने तिच्या शरीराचा ४-५ वर्षे होत असलेला दाह आज संपवला होता. त्या अनुभूतीच्या आठवणीने तिचा उरला दिवस आणि रात्र कशी सरली तिलाच कळले नाही.
दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे रंगा सकाळी गेटवर आला. पल्लवीने त्याला डबा दिला. काहीही न बोलता. तो निघून गेला. असे २-३ दिवस गेले. नंतर एका सकाळी. रंगा आला. तिने डबा दिला.
“आज दुपारी ३ ला!” एवढेच बोलून तो निघून गेला. अशाप्रकारे हे नित्याचेच झाले. दर ३ ते ४ दिवसांनी रंगा त्याच्या येण्याबद्दल तिला कळवत असे.
दोघेजण दुपारभर प्रणयात दंग होत असे. रंगाला आता उर्मीच्या येण्या न येण्याने काहीही फरक पडत नव्हता. पल्लवीला देखील शरीरसुखाची भयानक चटक लागली होती. रंगा तिच्या शरीराला पाहून भुकेल्या कुत्र्यासारखा तुटून पडत असे. तिचे मन भरून ओसंडून वाहत असे इतका प्रणय तिला मिळत होता. पल्लवीला रंगाच्या लिंगाचा आणि त्याच्या प्रणयशक्तीचा नाद लागला होता. तो यायच्या दिवशी ती छानपैकी सजून स्वच्छ होऊन बसू लागली होती. त्यांचा प्रणय घरात कुठंही सुरु होत असे. एकदा तर रंगाने तिने दार लावल्या लावल्या दारापाशीच नग्न करून जमिनीवर पाडून भोगली होती. कित्येकदा त्याने तिच्याकडे अनैसर्गिक गुदा संभोगाची मागणी केली होती. पण तिला भीती वाटत होती त्यामुळे ती कशीबशी त्याला त्यावरून टाळत असे. रंगाने तिला योनीवरचे केस काढायला लावून जिभेने पण तिच्या योनीचे लाड केले होते. पण अजून तरी पल्लवीने त्याचे लिंग तोंडात घेऊन त्याची किंमत चुकवली नव्हती. त्याचे काटक काळे अंगात रुतणारे खडबडीत अंगमेहनतीचे शरीर. त्याचा तीव्र पुरुषी वास… त्याच्या खुरट्या दाढीचे मानेवर टोचणारे उत्तेजित करणारे केसाळ स्पर्श. शरदच्या विपरीत असलेले रंगाचे सर्व काही, ह्यासगळ्या विसंगतीमुळे पल्लवीला त्याची नशा चढत होती.
तिला आता शरदच्या वागण्याबद्दल आणि पौरुषाबद्दल कसलीच तक्रार नव्हती. शरद त्याच्या रुटीनमध्ये बीजी होता. पण तिला रंगामुळे गर्भवती राहण्याची जबर खात्री होती म्हणून मग तिने शरदला अधूनमधून बळेच रात्री प्रणय करायला भाग पाडले. अतिशय कमजोर असा प्रणयाचा प्रयत्न करून शरद बाजूला व्हायचा. रंगाने सोडलेल्या विर्याच्या प्रमाणात शरदच्या पिंका काहीच नसायच्या. परंतु पल्लवीने तिचे नाटक व्यवस्थित वठवले. शेवटी व्हायचे तेच झाले. पल्लवी गर्भवती राहिली. तिला आता स्वतःच्या स्त्रीत्वाला पूर्णत्व मिळाले ह्याचा अतिशय आनंद झाला. फक्त तिला एकच भीती होती आणि ती म्हणजे होणारे मूल शारीरिक दृष्ट्या रंगासारखे असेल तर काय? कारण रंगाच तिला गर्भार करू शकतो हे उघड होते. जे होईल ते होईल. आपण सरळपणे शरदला गोष्टी कबुल करून टाकायच्या. त्याच्या स्वतःच्या अक्षमतेचे खापर तो तिच्यावर फोडू शकणार नाही. असा विश्वास तिला वाटत होता.
पहिले १-२ महिने रंगा आठवड्यातून एकदा येतच राहिला. त्याला तिच्या पोटी स्वतःचे मूल आहे ह्याचा काहीही फरक पडत नव्हता. तिचे मादक शरीर भोगण्याची लालसा त्याला तिच्या कडे ओढत होती. जसे ३ महिने झाले तसे पल्लवीची आई तिच्यासोबत राहायला आली आणि रंगाच्या अन पल्लवीच्या भेटीमध्ये खंड पडला. पल्लवीने पण आता तिच्या स्वतःच्या आईपणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. शरद देखील आनंदित होता. तो आता पल्लवीकडे व्यवस्थित लक्ष पुरवत होता. पुढचे सहा महिने भरभर गेले. पल्लवी प्रसूत झाली. तिला अगदी तिच्यासारखीच दिसणारी गोड परी झाली. खरेतर पल्लवीचा जीव भांड्यात पडला. इशा कुठल्याच प्रकारे रंगासारखी दिसत नव्हती. शरदबद्दल तर काही असण्याचा संबंधच नव्हता. तिचे नाव इशा ठेवण्यात आले.
पल्लवी प्रसूतीनंतर तिच्या आईकडे गेली. इशा जवळजवळ ६ महिन्यांची होईपर्यंत ती तिकडेच राहिली. शरद तिला अधेमधे जाऊन भेटत होता. ईशामुळे तो खूप बदलला होता. पल्लवी घरी आली. तिच्या आईकडे राहिल्यामुळे तिला फारसे काही करावे लागत नव्हते. इकडेही शरदने कामासाठी बाई लावलीच होती. त्यामुळे जेवण बनवण्यापलीकडे पल्लवीला फार काही काम नव्हते. बाळंतपणामध्ये पल्लवीचे शरीर चांगलेच भरले होते. तिचे वजन वाढून सर्व अवयवांना अधिक गोलाई आली होती. रंग उजळला होता. पल्लवीच्या कमरेवर एक छानशी वळी आली होती. तिची मादक बेंबी आणखी थोडी खोल झाली होती. कमरेचा घेर वाढला होता. तिचे दुधाळ स्तन चालताना मस्त हिंदोळे खात होते. जुने ब्लाउज टाकून सगळे नवे करावे लागले होते. ईशा ६-७ महिन्याची असल्यापासून तिने अंगावर पिणे सोडले. त्यामुळे तिच्या स्तनाना फार काही झुकाव आला नव्हता. खरेतर आता तिच्या नवऱ्याला तिच्या शरीराबद्दल आणखी जास्त आकर्षण वाटायला हवे होते. पण तो काही तसल्या खुणा दाखवत नव्हता. पल्लवीला पण त्याच्याकडून तशी काही अपेक्षा नव्हती. लहानग्या ईशामुळे तिला कामभावनांची तीव्रता अजूनतरी फारशी जाणवत नव्हती.
पल्लवी घरी येऊन २०-२२ दिवस झाले होते. एका दुपारी पल्लवी तिच्या घराबाहेर असणाऱ्या फुल झाडांना पाणी घालायला बाहेर आली. पाणी घालून होतच आले होते तोच तिची नजर गेटकडे गेली. गेटला हात लावून पाठमोरा एक माणूस उभा होता. तो बिडी ओढत होता. शर्ट चुरगलेला, मागून पॅन्ट पण चुरगाळून थोडी वर आली होती. गलिच्छ अवतार होता. कुरळ्या केसांचा झाप झाला होता. त्याने बिडी ओढतच मागे वळून पहिले. पल्लवीने त्याच्या कडे पहिले आणि ती उडालीच.
“रंगा?” तो रंगाचं होता. त्याने तिच्याकडे पाहून स्मित केले. तिने घाईघाईने होजपाईप टाकला आणि आत निघून गेली. ओट्याच्या पायऱ्या चढत असताना तिच्या सुती साडीमधून नितंबांचे घुसळणे पाहून रंगाने स्वतःच्या लिंगावर हात फिरवला.
त्या गोष्टीला ४-५ दिवस झाले असावेत. दुपारी ईशाला झोपवून पल्लवी बेडरूम बाहेर आली. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता. पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. घराच्या मागे कपडे वाळत घातले होते. ते आणण्यासाठी ती मागे गेली. वाळलेले कपडे काढून ती मागच्या दाराने आत येतच होती. तेवढ्यात मागून तिला धक्का बसला ती चार पाच पावले आत ढकलली गेली. क्षणभर तिला कळलेच नाही. ती ओरडणार तेवढ्यात तिच्या तोंडावर एक पंजा आला. तिच्या कमरेला एका हाताचा विळखा पडला. तिच्या हातातले सगळे कपडे अस्तव्यस्त खाली पडले. तिचे पाय जमिनीवरून उचलल्या गेले.
तिला ओरडावेसे वाटत होते. पण तिला धक्काच एवढा अकस्मात बसला होता कि ती प्रतिक्रिया देईपर्यंत ती उचलून तिच्या आत्याच्या वापरात नसलेल्या बेडरूममध्ये आणली गेली होती. ती त्याच पलंगावर फेकली गेली.
पडल्या पडल्या तिने स्वतःला सावरत मागे वळून पहिले. तो रंगा होता.
“काय? पल्लूराणी … स्वतःचे काम झाले. लगेच गेली का मला विसरून?” रंगा स्वतःचा मळकट शर्ट उतरवत म्हणाला. पल्लवी उठून बसली. रंगा उघडा झाला होता. त्याचे ते किडकिडीत शरीर आणखी अस्थिपंजर झाले होते असे पल्लवीला वाटले.
“हे बघा… तुम्ही जा… प्लिज.. मला हे असले काही आता जमणार नाहीये.” पल्लवी त्याच्या उघड्या शरीरापासून लक्ष दुसरीकडे वळवत म्हणाली.
तिचा पदर छातीवरुन सरकला होता. गेल्या वर्षभरात वृद्धिंगत झालेल्या तिच्या वक्षाकडे उपाशी लांडग्यासारखा पाहात रंगा म्हणाला,” तुला नाय जमायचं असं करायला? का? नवऱ्याचा उठायला लागला का काय? का दुसरा भेटला कोणी?”
“शी… ” ती म्हणाली.
“माझ्या हत्यारावर तू कशी फिदा हायेस मला म्हाईत नाय अस वाटतंय का तुला?” तो म्हणाला आणि तिच्या जवळ पलंगावर चढला. ती मागे सरली.
“माझी चूक झाली त्यावेळी. शिवाय.. शिवाय… उर्मी नव्हती म्हणून तुमची गैरसोय होत होती आणि तिला त्रास नको म्हणून… म्हणून मी..मी…” ती मागे मागे सरत बोलली.
“म्हणून तू तयार झाली व्हतीस का?’ त्याने तिचा घोटा पकडला. “माझ्याबरबर ह्या घरात सगळीकडं नागडी नाचली हायेस ते उर्मी नव्हती आणि माझी गैरसोय होऊ नये म्हणून व्हय?” तो म्हणाला.
तिने स्वतःला आणखी आक्रसून घेतले. पण रंगाचा हात तिची पोटरी चोळत होता. त्याने एका हाताने त्याच्या पँट खाली सरकवली आणि सर्रकन त्याने आतली अंडरवेअर खाली ओढत त्याचा सोटा मुक्त केला. केसाळ पुंजक्यामध्ये डोलणारा तो काळाकभिन्न सोटा पाहताच पल्लवीने डोळे मिटले. अजून तो पूर्ण भरातही नव्हता. पल्लविचा श्वास अडकला. मागच्या जाणिवा तिला पुन्हा घेरू लागल्या होत्या. रंगा बोलत होता ते काही पूर्ण चूक नव्हते. सुरुवातीला तिला वावगे वाटले होते पण नंतर रंगासोबतच्या समागमामध्ये तिला भयानक आनंद मिळाला होता. तो यायच्या वेळी तिची कामातुरतेने त्याची वाट पाहत असे. आता तर तिच्या शरीरामध्ये खूपच बदल घडला होता. ती आत्मविश्वासू स्त्री झाली होती. सुंदर आणि यौवनाने भरपूर असलेले तिचे शरीर कामसुखाचे हक्कदार होते. तिला कामसुख मिळायलाच हवे होते. नवरा सक्षम असता तर कदाचित तिच्यावर हि वेळ आली नसती. पण आता मिळाली संधी तरी का सोडायची?
ती विचार करतच होती. तेवढ्यात त्याने तिच्या मानेमागे हात नेत तिचे तोंड त्याच्याकडे वळवले. भसकन बिडीचा वास तिच्या नाकात घुसला. रंगाने त्याचे तोंड तिच्या ओठांवर दाबले होते. तिच्या ओठांपलीकडे त्याची जीभ गेली. कचकचीत चुंबन घेत रंगाने तिला पाडली. पटकन पदर ओढत तिची साडी काढून फेकली. तिचे गोरे गुलाबी गच भरलेले अंग त्याच्यासमोर पसरले होते. त्यानं तिच्या ब्लाऊजला हात घालत दोन्ही पाकळ्या ओढल्या ब्लाउज फाटून त्याचे हूक्स उडून पडले. इशा झाल्यापासून घरात तिची ब्रा घालायची सवय मोडली होती. ब्रा नसल्यामुळे तीची दुधाने ओथंबलेली थाने त्याच्यासमोर उघडी झाली. तिची स्तनाग्रे आता आधी सारखी छोटी नव्हती. ती मोठी झाली होती. स्तनाचा आकार आणि जडत्व ह्यांना ती मोठी स्तनाग्रे शोभत होती. रंगाने अजिबात वेळ न दवडता. तिच्या स्तनाला तोंड लावले आणि तिचे गोडस स्तन दोन्ही हातानी दाबत पिळत चोखु लागला.
पल्लवीच्या शरीरामधून बऱ्याच दिवसांनी निद्रावश पडलेल्या काम संप्रेरकांना जाग आली आणि ते स्त्रवू लागले. रंगाच्या अधाशीसारख्या स्तनांना झोंबण्यामुळे पल्लवीच्या शरीरातल्या कामकुंडात अग्नी पडला आणि कुंड धगधगू लागला. तिचे हात त्याच्या डोक्यामध्ये फिरू लागले. एका हाताने रंगाने टिक परकरमध्ये जात मांड्या चोळायला सुरुवात केली. पल्लवीच्या मांड्या आणि नितम्ब बाळंतपणानंतर चांगलेच वाढले होते. रंगाचे तोंड आणि हात अव्याहतपणे चालू होते. पल्लवी गरमसुसा उसासे सोडत कण्हत होती. त्याने मधूनच स्तनावर एखादा चावा घेतल्यावर “आह” करून ओरडतही होती. रंगाचा तोच पुरुषी घामट दर्प तिच्या रंध्रात घुसला. तिच्या मांड्या आपसूकच बाजूला झाल्या. तिने त्याचा मांड्यांवरून फिरणारा हात धरला आणि स्वतःच्या पॅंटीवर आणून ठेवला. तिच्या ह्या कृतीने रंगाला चिथावले. त्याने पटकन स्वतःला उचलत स्वतःची अंडरवेअर आणि पॅन्ट काढून फेकले. तिच्या परकराची नाडी धरून ओढली आणि सरळसरळ टरकावला. तिच्या कमरेमध्ये घट्ट चिटकून बसलेल्या तिच्या पँटीला तिच्या भरदार मांड्यांमधून सोलून काढत रंगाने तिची पाणवलेली केसाळ योनी उघडी केली. पटकन तिच्या अंगावर झेपावत त्याने परत तिच्या थानांवर आक्रमण केले.
पल्लवीच्या मांड्यांमध्ये तो नग्न दांडका येऊन घासताच तिच्या शरीरामध्ये कंपने निर्माण झाली. ते दुखावणारे रानटी सुख तिला आता हवे होते. खूप दिवस तिला पुरुषी सहवास मिळाला नव्हता. तिच्या अंगप्रत्यंगाला चोंबाळुन टाकणारा तो पाशवी शृंगार करायला ती सिद्ध झाली. रंगा तिचे स्तन दाबण्यात चोखण्यात दंग होता पण पल्लवीला आता त्या नराच्या लिंगाचा मारा तिच्या योनीमध्ये हवा होता. बाहेर मे मधल्या वळवाच्या पावसाने ताल धरायला सुरुवात केली होती. धरतीचा उष्मा त्या थंडाव्याने विझत चालला होता. पल्लवीलापण तिच्या कामदग्ध शरीराला थंडावा हवा होता. तिने तिच्या मांड्या आणखी पसरल्या आणि रंगाचे लिंग दोघांच्यामध्ये हात घालत पकडले.
“स्स्स….. हा….. लै घाईत हायस तू आज?” रंगा म्हणाला.
तिने काहीही न बोलता त्याच्या डोळ्यात बघत त्याचा सोटा स्वतःच्या लिंगावर रगडला. तिच्या योनीच्या फटीवर जसे त्याचे टोक आले तसे तिने कंबर उचकवत त्याचे लिंग फटीतून आत घेण्यासाठी योनीवर दाबले. रंगाला सांगायची गरज नव्हती. तिच्या तोंडात तोंड घालत त्याने त्याचा सोटा तिच्या खुप काळापासून न भोगल्या गेलेल्या योनीमध्ये ठेचला. पल्लवीचे डोळे मोठे झाले. तिनेपण रंगाला जोरकस मिठी मारली. तिच्या मांड्या त्याच्या कमरेभोवताली घट्ट बसल्या. रंगाने तिला भोगायला सुरुवात केली.
अह्ह्ह..आःह्ह…आई आई… ग…स्स्स्स… आआह्हह्हह्ह….. ” पल्लवी मोठ्याने किंचाळत रंगाला प्रतिसाद देत होती.
बाहेर ढगांचा गडगडाट चालू होता. उष्ण मातीचा गंध पसरला होता आणि आतमध्ये रंगा आणि पल्लवीच्या शृंगाराचे ढग आवाज करत होते. रंगाच्या पार्श्वभागावर हात फिरवत मधेच त्याला चुंबन देत पल्लवी मनमोकळेपणाने प्रणयात धुंद झाली होती. रंगा तिला चांगलाच ठोकत होता. साधारण पहिल्या 3 ते ४ मिनिटांमध्येच पल्लवीचा बांध फुटू लागला.
“आईईई…. आअह्ह्ह्ह…” असे मुक्त कंठाने ओरडत पल्लवीने रंगाच्या ठोक्यांना कंबर हलवत प्रतिसाद दिला आणि स्वतः मोकळी करू लागली.
रंगाने तिला थांबून झडू दिले. पल्लवी थोडी शांत झाली. तशी द्रुतगतीने त्याने तिची योनी चेचायला सुरुवात केली. इतक्या दिवसांनी तो पल्लवीला करत असल्यामुळे त्यालाही आता बांध धरणे अवघड जाऊ लागले. त्याने तिच्या नितंबांच्या खाली हात नेत तिच्या गुदेवर बोट नेले. तशी ती थरारली. तिचा अतिसंवेदनशील भाग त्याने चाचपला होता. तिने त्याला करकचून आवळले. शेवटी रंगाने संयम सोडला आणि लिंगाला आचके देत तो तिच्या योनीमध्ये रिता होऊ लागला. भरगोस उष्ण असे वीर्य तिच्या योनीमध्ये फवार त्याने तिच्या छातीवर दम तोडला.
काहीवेळ ते शांत पडून राहिले. पण वेळ आणि आसक्ती दोन्हीपण भरपूर होते. दोघेजण काही वेळातच परत सुरु झाले. त्यादिवशी रंगाने तिला चांगली ३ वेळा भोगली. बोटे घालून त्याने तिच्या गुदद्वाराला पण चेतवले. तिथले कौमार्य भंग करण्याची त्याची मनीषा त्याने परत एकदा तिला बोलून दाखवली. पण ती वेळ योग्य नव्हती. पल्लवी खूप दिवसांनी तृप्त झाली होती. रंगाच्या पौरुषाने तिचे स्त्रीत्व कमालीचे सुखावले होते.
मात्र रंगाने जाता जाता पल्लवीला मोठा धक्का दिला.
तिसऱ्या बाळंतपणामध्ये उर्मिला फिट येऊन तिच्या मेंदूची नस फाटली आणि ती गेली. बाळही गेल्याचे सांगितले. तिच्या दोन्ही मुली आता मामाकडे राहत होत्या. रंगा आता स्वतःपुरते कमावून एकटा राहत होता. पल्लवी यायची वाट बघण्याखेरीज त्याला काहीही काम नव्हते. सहज एखादी गोष्ट सांगावी इतका तो निर्विकार पणे सांगत होता. स्वतःच्या कामसुखाच्या प्राप्तीमध्ये आणि बाळंतपणामध्ये पल्लवीला उर्मीचा अगदी विसर पडल्यागतच झाले होते. रंगाने उर्मिला सांगितले होते कि पल्लवीकडून त्याला जेवणाची सोय झाली आहे. पल्लवीचा मात्र रंगासोबत प्रणय सुरु झाल्यापासून उर्मीसोबत संपर्क बंद झाला होता. शरीराच्या वासनेच्या डोहात बुडून तिचा मैत्रिणीशी असलेला दुवा तुटला होता. रंगा कपडे घालून निघून गेला पण पल्लवी मात्र तशीच बराच वेळ बसून आसवं ढाळीत होती. तिला प्रचंड अपराधी पणाच्या भावनेने घेरले होते. ईशाच्या रडण्याने ती भानावर आली स्वतःला सावरत ती ईशाकडे गेली. त्या दिवसापासून तिने रंगाला स्वतःपासून दूर ठेवले. सतत तिला मैत्रिणीशी दगा केल्याचं भावना आतून खात होती. तिला स्वतःला माफ करवत नव्हते. रंगा घराच्या अवतीभवती घिरट्या घालायचा. पण आता पल्लवी सावध होती. तिने त्याला कधीच आत घेतला नाही. काही दिवसांनी त्याने येणे बंद केले.
जवळ जवळ वर्ष दीड वर्ष असेच गेले. तिच्या मनावर आता इतका ताण राहिला नव्हता. ती सावरली होती. दुखऱ्या मनावर काळ नेहमीच मलमाचे काम करतो. त्यामुळेच एकदा दुपारी ईशाला घेऊन बाहेर जाऊन घरी येताना तिला घरासमोर फूटपाथवर रंगा दिसला. तिने त्याला पहिले आणि नजर वळवली. तो थबकला. ती गेट उघडून घरात गेली. पेंगलेल्या ईशाला तिने बेडमधे निजवले. तिचे व्हॅक्सिनेशन करून ती परत आली होती. रिक्षातच ईशा झोपी गेली होती. रंगाला खूप दिवसांनी पल्लवीने पहिले होते. त्याच्याशी त्या दुपारी केलेला संग तिच्या डोक्यामध्ये घुमू लागला. तिला अचानक कामभावनेने घेरले. किती दिवस उपास घडला होता. शरदने सेक्स बाबतीत पूर्ण मान टाकली होती. तिच्यातली स्त्री तिला आता साद घालू लागली.
पल्लवी खिडकीपाशी आली तिने बाहेर गेटकडे पहिले. रंगा गेटपाशी बिडी फुंकत उभा होता. ती दारापाशी गेली. ती दार उघडले. उघडताना हेतूपुरस्कर कडीचा आवाज केला. रंगाने त्या आवाजाने मागे वळून पहिले. दार उघडे ठेऊन आत जाणारी पल्लवी त्याला दिसली. हातामध्ये असणारी बिडी शेवटचा कश मारून त्याने फेकून दिली आणि गेट उघडून तो आत गेला. संपूर्ण नग्न होऊन दोघेजण एकमेकांना भोगत होते. रंगाच्या लिंगाने एकदा पल्लवीची तहान भागवली होती. दुसरा अंक चालू होता. पल्लवीच्या मांड्या करकचून रंगाच्या कमरेला बिलगल्या होत्या. त्याच्या जाडजूड सोट्याचे दणके सोसत पल्लवी त्याचे डोके कुरवाळत होती. त्यांना कसलेच भान उरले नव्हते.
त्यामुळेच जेव्हा बेडरूमच्या दारापाशी धपकन आवाज झाला तेव्हा दोघेजण दचकलेच. शरद छातीला हात लावून तळमळत दाराशी पडला होता. येताना रंगाने बाहेरच्या दाराला कडी घातली नव्हती. ईशाला आज लस देणार होते. त्यानंतर तिला ताप येतो हे माहित असल्यामुळे शरद आज लवकर घरी आला होता. उसासे आणि पैंजणांची किणकिण ऐकून तो त्याच्या आईच्या रूमकडे गेला आणि समोरचे दृश्य पाहून वाढलेल्या बी पी मुळे तिथेच त्याला पॅरालिसिसचा जबर अटॅक आला. त्याची बोबडी वळतच होती त्यासोबतच हृदय विकाराचा तिव्र झटक्याने त्याला जागेवरच निष्प्राण केले.
****
पल्लवी त्या आठवणीने भानावर आली. आज तिची लेक निघून गेली होती. तिचा संसार आपल्या कडून झालेल्या चुकीमुळे मोडता मोडता वाचला. कारण ईशाच्या मुलामध्ये आलेले व्यक्तिमत्वाचे धागे सरळसरळ रंगाशी जुळलेले होते. रंगा ईशाचा बाप होता. जे ईशामध्ये लपून राहिले ते तिच्या बाळामध्ये समोर आले होते.
उर्मीकडे केलेल्या दुर्लक्षाने तिचा जीव गेलेला सुद्धा आपल्याला कळला नाही. आपण आपल्या कामविश्वात रममाण राहिलो आणि ती बिचारी जीव सोडून गेली.
आपण प्रणयधुंद अवस्थेमध्ये असताना नवऱ्याने ते पाहून प्राण सोडला. कामलालसेने आपल्याला भयानक अंध केले होते. त्या निष्पाप जीवाची काय चूक होती जर तो शारीरिक दृष्ट्या सक्षम नव्हता. त्याचा जीव जाणे चूक होते. आपण असे काही करू असे शरदला स्वप्नातही वाटले नसेल. केवढा मोठा विश्वासघात केला आपण. त्या धक्क्याने शरद गेला. त्याला तर आपणच मारले.
आज २४-२५ वर्षांनी आयुष्यातल्या सगळ्या वाईट घटना तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. मोठा निश्वास सोडत पल्लवी उठली. संध्याकाळचे सात साडेसात झाले होते. अचानक तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली.
“इशा गेली आसल तर येऊ का आज?”
“९ वाजता” पल्लवीने रिप्लाय केला.
५० वर्षांची पल्लवी आणि साठीमधला रंगा आज भेटणार होते. सगळी रात्र ते एकत्र घालवणार होते. नवरा गेल्यानंतर पल्लवीने ईशाचा सांभाळ करता करता स्वतःच्या आयुष्याशी तडजोड मान्य केली नव्हती. निसर्गदत्त सौंदर्य नुसतेच वाया घालवण्यापेक्षा आनंद देण्या घेण्यातले समाधान तिने निवडले होते. तिने केलेल्या भुलीचे परिणाम आता पूर्णपणे भोगून झाले होते. आता तिला चिंता नव्हती. आत्याच्या रूममध्ये पलंगावर टाकण्यासाठी तिने नवी बेडशीट काढली. मनावरची धूळ झटकत ती रात्रीला कामधुंद करण्यासाठी सजू लागली.
– समाप्त.