भूऽऽऽत -(भाग २)(अंतिम भाग)
त्या रात्री परत तिच्या बिछान्यावर पडल्यापडल्या रेखा मनात आनंदी होत शेवटी तिला भूत उतरवण्याची कला सापडल्याबद्दल देवाचे व मामामामीचे आभार मानत होती. भूत या विषयावरुन तिच्या सगळ्या मैत्रिणी नेहमी तिची थट्ट करत. पण आता तिच्याकडे सज्जड पुरावा होता, की भूत लागल्यावर काय होत आणी त्यांना उतरवायाची विद्द्या तिला येत होती. आता ही विद्या ती तिच्या मैत्रिणीना शिकवु शकत होती. त्यामुळे …