सलज्ज निर्लज्जता – Part 1

” चारू.. काल त्या वऱ्हाडेंचा कॉल आला होता.” सकाळी घाईची वेळ असून पण मी वऱ्हाडेंचे नाव घेतल्यावर चारू थोडी सावध झालीच. मी चहा घेत होतो.

“ह्म्म्म… काय म्हणत होते.” तिचा स्वतःचा डबा भरत ती म्हणाली.

२-३ दिवस कोकणात जाऊयात का फॅमिली ट्रिप करायला असे विचारत होते.”

“मग तू काय म्हणालास?” तिने विचारले.

“हरकत नाही बोललो. एकदा आपल्या सगळ्यांची सवड निघू देत जाऊ म्हणालो.” मी तिला सांगितले.

“ह्म्म्म… ठीके असे पण खूप दिवस झाले आउटिंग नाही झाले. जाऊन येऊ कुठे तरी. मी पण संगीताशी बोलते आज भेटली की?” चारू मला बोलली.

“चला म्हणजे बनला प्लॅन. वऱ्हाडे असे पण बऱ्याच वेळा मला विचारत होते.” मी म्हणालो.

“हा तुझी कंपनी आवडते त्यांना. संगीता म्हणत होती. तू डॅशिंग आहेस आणि उत्साही पण असे त्या दोघा नवरा बायकोचे तुझ्या बाबतीत मत आहे.” चारू मला म्हणाली.

“कोकणात माझ्या डॅशिंग पणा आणि उत्साहाचे काय करणारे? खरे कारण तर तू आहेस. वऱ्हाडे तुझ्या आजूबाजूला राहायची एकही संधी सोडत नाही. मला कळत नाही असे वाटते का तुला?” मी बोललॊ आणि चहाचा सिप मारून चारुच्या प्रतिक्रियेची वाट पहात थांबलो.

चारुला एखादे उत्तर पटकन सुचत नसेल तर ती गालात मंद हसत माझ्याकडे जसे पाहायची आत्ताही तिने तसेच पहिले.

“किशॊर आज सकाळच काय शिरलंय तुझ्यात?” ती चहाचा कप घेऊन माझ्याकडे आली आणि शेजारी बसली. तिच्या शाम्पूने स्वच्छ धुतलेल्या केसांमधून सुगंध येत होता. बसल्याबसल्या तिने पायावर पाय ठेवत तिच्या नेहमीच्या शैलीत पोज घेतली. मला माझ्या सुंदर बायकोचे नेहमीच कौतुक वाटत आले होते. तिची सुंदरता नुसती तिच्या शरीरात किंवा चेहऱ्यात नव्हती तर ती तिच्या वागण्यात बोलण्यात वावरण्यात सगळ्यातुनच दिसायची.

“काही नाही. सत्यशोधक आत्मा आहे माझी. मी कधी खोटे नाही बोलत.” मी म्हणालो.

“कसलं सत्य सांगत आहेस मला?” तिने चहा घेत विचारले.

” हेच कि तुझ्या सौंदर्याचा केवळ मी एकटाच पाईक नसून आणखीही आहेत. ज्यांना वाटते कि तू काही प्रमाणात तरी त्यांच्या वाट्याला यावी.” मी तीला सूचकपणे म्हणालो.

“ओह्ह… आणि तू जसा काय अगदी नाकासमोर पाहून चालणारा आहेस. नाकासमोर पाहून चालतोस पण दुसऱ्याच्या.” चारूपण काही कमी नव्हती. माझ्यासारखेच तिनेपण माझे निरीक्षण केले होते.

“मोकळेपणाने बोल ना?” मी तिला आणखी उत्तेजन देत म्हणालो.

“संगीताकडे कितीदा चोरून पाहतोस रे? हे तू नाही, तिने मला पहिल्यांदा सांगितले. म्हणे माझ्या सौंदर्याचा पाईक.” चारू माझ्यावर वार उलटवत म्हणाली.

“पण माझ्या तिच्याकडे पाहण्यावर तिने आक्षेप घेतला का?” मी मिस्कील पणे विचारले.

“किशू बायको आहे मी तुझी. लाज नाही वाटत का मलाच विचारतोयस. हद्द आहे तुझी !” ती डोळे मोठे करून मला म्हणाली.

“अगं! मी अशासाठी विचारत आहे कारण वऱ्हाडे उघड उघड तुला ताडतो हे तुला माहित असून तू कधी माझ्याकडे आक्षेप घेतला नाहीस.” मी तिला पकडले.

“मला उशीर होतोय. जाते मी.” चारू गोरीमोरी झाली होती.

पर्स उचलत तिने सँडल्स पायात घातले. मी तिच्या टाईट लेगीन मधून डोकावणाऱ्या भरीव मांड्या बघत होतो. तिच्या बांधेसुत गोऱ्या शरीरावर डिझायनर मेड पिवळा स्लिव्हलेस टॉप आणि जांभळ्या रंगाची लेगिन सुंदर दिसत होती. तिच्या कपड्यांचा “ऑड” चॉईस तिला नुसते सुंदर नाही तर अभिरुची संपन्न पण बनवत होता.

“रात्री बोलू ह्यावर.” मी म्हणालो.

“अशक्य आहेस तू.” ती डोळे फिरवत म्हणाली. मी तिला फ्लायिंग किस दिला. ती मान हलवत निघून गेली.

****

मी किशोर आणि माझी बायको चारुता गेली १० वर्षे लग्न बंधनात घट्ट अडकलो होतो. माझे वय ३४ आणि चारुचं ३२ आम्हाला एक मुलगा आहे. ७ वर्षांचा. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. चारू एका शाळेत शिक्षक आहे. आत्ता वयाच्या पस्तिशीमध्ये आम्ही दोघेही सेटल आहोत. छान चालले आहे. अगदी कसलीच तक्रार नाही. आम्ही दोघेजण एकमेकांना पूरक आहोत आणि आमचा बछडा म्हणजे केकवरची चेरी. मध्यमवर्गीय सुखी संसार. मला ट्रॅकिंगची आणि व्यायामाची आवड असल्यामुळे मी फिटनेसच्या बाबतीत नेहमीच नशीबवान आहे. माझे पोट कधी सुटले नाही कि वजनाने त्याची सीमा रेषा ओलांडली नाही. ५-८” उंचीमध्ये ७० किलो वजनात छानशी स्नायुयुक्त बॉडी मला माझ्या वयाच्या ४ ते ५ वर्षे मागेच ढकलते. चारू योगा अतिशय उत्तम करते. तिचे शरीर चांगलेच फ्लॅक्सिबल आहे. ५-३” उंचीच्या चणीमध्ये ३४-३०-३६ ची तिची मादक फिगर तिचा भरीव पणा दर्शवत असते. तिला शोल्डर लेन्थ केस आवडतात. चालताना तिच्या नितंबांची होणारी हालचाल लग्नानन्तर आणि प्रेग्नन्सी नंतर खूपच मादक झाली आहे. आमच्या शेजारी आणि नातेवाइकांमध्ये आम्ही एक सुंदर जोडपे म्हणून प्रसिद्ध आहोत.

चारुसोबतचे माझे कामजीवन अतिशय सुंदर आहे. आठवड्यातून २-३ वेळा आम्ही प्रणय करतो. तिचे संपूर्ण समाधान करून मगच माझे समाधान करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे याचा चारुला सार्थ अभिमान आहे. तिला हळूहळू अंगप्रत्यंग फुलवत सावकाश केलेला प्रणय आवडतो. एक दिवस संपूर्णपणे तिचे ऐकत मी तिचे समाधान करतो तर एक दिवस पूर्णपने माझे ऐकत ती समाधान मिळवते. मला काही वेळा अतिशय रांगडा प्रणय आवडतो. मी म्हणतो म्हणून चारू मला साथ देते, पण तिची आवड संथगतीने केलेला प्रणयच आहे. तिचे लवलवते शरीर, तिचे कामातुर होऊन सर्वांगाचे लाड करून घेणे आणि सर्वात शेवटी स्खलनाच्यावेळी माझ्या सर्वांगाला घट्ट मिठीत घेत मला बोचकारत झडणे हे सगळे काही भयानक नशिले होते. असे नाही कि मला कधी दुसरी स्त्री आकर्षित करू शकली नाही. पण मी चारूशी कधी प्रतारणा केली नाही. उलट मला एखाद्या स्त्रीबद्दल काय वाटले हे मी तिला मोकळेपणाने सांगून टाकत असे. माझ्या प्रामाणिकपणाने मत प्रदर्शन करण्याने चारुचा माझ्याबाबतचा प्रेम आणि आदर कधीही कमी झाला नाही. उलट त्यामुळे आमचे नाते आणखी पारदर्शक झाले. पण तिचे कधी कोण्या पुरुषाकडे मन आकर्षले असेल असे मला दिसले नाही आणि मी कधी तिला तसे विचारलेही नाही. पण आमच्या आयुष्यात ती वेळ येणार आहे असे मला कधी वाटले नव्हते.

२ वर्षांपूर्वी चारुच्या शाळेत संगीता वऱ्हाडे जॉईन झाली. पुढच्या ३ महिन्यांमध्ये त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली. संगीता ३६ वर्षांची स्त्री होती. चारूने एकदा तिला संक्रांतीला हळदी कुंकवांसाठी बोलावले होते. मी तिला पहिल्यांदाच पाहिलं आणि पाहात राहिलो. ती चारूपेक्षा २ ईंचं उंच होती. शरीर उफाड्याचे भरलेले होते. सगळीकडूनच चारूपेक्षा तिची मापे जास्त होती. गोरी अंगकांती, गोल चेहरा, डबल हनुवटी आणि तिच्यावर जाडसर चुंबनासक्त ओठ. तीच्या केसांचा लांबलचक शेपटा, सगळ्यात महत्वाचे म्हणजे तिचे पिंगट मादक डोळे. तिच्याकडे सतत बघत राहावेसे वाटत होते. पहिल्या भेटीत अगदीच जुजबी बोलणे झाले. पण मी नजरेने जे काही बोललो होतो त्यातला मतितार्थ तिला कळला होता. माझ्या नजरेने ती घाबरली होती असेच मला दिसले. कारण माझ्या मनातले तिच्या बाबतीतले विचार नजरेतून अगदी सहज सांडत होते. स्त्रियांना एक सिक्सथ सेन्स असतो. त्यांना वेगळी नजर कळते. त्यानंतर जेव्हा केव्हा आमची भेट झाली तेव्हा तिची देहबोली तिच्या मनातली अस्वस्थता दर्शवत होती.

तिची माझी नजरानजर क्वचितच होत होती. पण जेव्हा मी तिच्याकडे बघत नव्हतो तेव्हा तिची माझ्याकडे वळणारी नजर मला जाणवत होती. मी तिच्या व्यक्तिमत्वाने भारलो होतो. तिचा मादक देहच नाही तर तिचे अस्तित्वच मादक होते. माझ्या मनात असणाऱ्या प्रणयाला चारू तशी कमी पडत नव्हती पण संगीता पुरून उरत होती असे मला वाटले. मी तिला माझ्याशी बोलण्यासाठी उद्युक्त करत होतो पण तिला कसलेतरी जडत्व आल्यासारखे ती वाटत होती. ते तिचेच वैचारिक जडत्व आहे हे मला चारू कडून कळले.ती एकत्र कुटुंबात राहिली होती. ज्या शहरात ती जन्मली होती आणि लग्नानंतरहि तिचे वास्तव्य होते ते शहर तसे सध्या ढंगाचे होते. तिचे माहेर आणि सासर दोन्हीही फार काही पुढारलेल्या विचारांचे नव्हते. त्यामुळे तिचे राहणीमान आणि वागायची पद्धत जुन्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत होते. तरीही तिचे मला खूप आकर्षण वाटत होते. तिच्यातला सात्विक रसरशीतपणा मला सतत चाखावासा वाटत होता.

एकदा आमच्या शहरात आलेल्या एका जत्रेला आम्ही गेलो होतो. तिकडे वऱ्हाडे कुटुंब आम्हाला भेटले. माझी आणि महेश वऱ्हाडेंची पहिल्यांदा तिथे ओळख झाली. तो माणूस संगीतापेक्षा जवळजवळ ९ वर्षांनी मोठा होता. असे मला चारूकडून कळाले होते. तब्येतीने जरासा स्थूल ,उंचापुरा आणि चांगलाच देशी रंग असलेला महेश वऱ्हाडे गव्हर्मेंटमध्ये एका रिजनल ऑफिसला बदली होऊन आलेला. जशी संगीताने चारुची आणि माझी वऱ्हाडेंसोबत ओळख करून दिली तशी त्याची नजर चारुवर स्थिर झाल्याचे निरीक्षण मी मनात नोंदवले. आम्ही सगळी जत्रा एकत्रच फिरलो. त्या पूर्ण वेळेत आणि डिनर वैगरे घेईपर्यंत मी संगीताकडे आणि वऱ्हाडे साहेब चारुकडे पाहात होते. जेवण करताना आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. वऱ्हाडे तसा दिसायला एवढा खास नसला तरी त्याचे ज्ञान आणि चौकस पणा चांगला होता. मनाने मला मोकळा आणि भला वाटला.

आमची फ्रिक्वेन्सी बरीच अंशी जुळली. त्याला काही काँटॅक्ट्स हवे होते. जे माझ्याकडून त्याला मिळाले. आमच्या दोघांमध्ये वयाचा तसा बराच फरक असल्यामुळे मी त्याला आहो जाहो म्हणूनच बोलत होतो. संगीता माझ्याकडे चोरून पाहताना मी ४-५ वेळा पहिले. चारू बोलायला बिनधास्त होती. तिच्या तोंडून जनरली काहीही निघाले तरी वऱ्हाडे त्यात इंटरेस्ट घेत होता. संगीता फारशी बोलत नव्हती. तिच्या साडीमध्ये चालताना घुसळणाऱ्या शरीराकडे माझे लक्ष जाताच माझ्या शरीरात कामुक लहर दौडत होती. तिची लाजण्याची अदाच मला तिच्याकडे जास्त आकर्षित करत होती. आमची मुले लगेचच मिक्स झाली. माझा गोड मुलगा त्यांच्या दोन्ही मुलांचा लाडका झाला.

त्यानंतर जवळ जवळ एक ते दिड वर्षात वऱ्हाडे कुटुंबीय आणि आम्ही शिंदे कुटुंबीय बऱ्याचदा जेवणासाठी, फिरण्यासाठी एकत्र येत गेलो. वऱ्हाडेंची आणि माझी अशा एक खास मैत्री जमली. कधीकधी वीकेंडला आम्ही आमच्या इथल्या एका बार मध्ये २-२ पेग घेण्यासाठी किंवा बिअर वर चर्चा करण्यासाठीही एकत्र येत गेलो. त्या काळात मला वऱ्हाडेंचे चारुबाबतचे इंटेन्शन कळले होते. तर माझी नजर संगीताने ताडली होती. वर्हाडेच्या मनाची अवस्था चारुकडे पाहताच काय होत असेल मला कळत होते. मी संगीताकडे आकृष्ट झालो आहे हे चारुला माहित होते. तसेच वऱ्हाडे तिच्याकडे कसा पाहतो हेही तिला माहित होते. ती माझ्याशी मात्र त्याबाबत काहीही बोलली नव्हती. ती त्याला रिस्पेक्टनेच आणि मैत्रीच्या नात्यानेच वागवत होती. संगीताला तिच्या नवऱ्याचे इंटेन्शन कळले होते कि नाही मला माहित नव्हते. पण मी तिच्याकडे खेचला गेलो आहे हे तिला माहित होते.

एक पातळ अशी धुक्याची भिंत तयार झाली होती ज्यामागे आम्हा चौघांच्याहि मनातल्या गोष्टी दडल्या होत्या. त्या भिंती विरण्याची वाट पाहायची कि स्वतःच मोकळेपणाने ती भिंत पुसून टाकायची ह्याचा निर्णय कोणीच घेत नव्हते. पण लवकरच हा साचलेला भावनिक कुंदपणा मोकळे करणे गरजेचे होते. योग्य संधीची वाट न पहाता ती संधी मी तयार करण्याचे ठरवले. पण तसे करण्याआधी मला चारुचा ह्याबाबतीत काय विचार आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटले. मला माझा तिच्यासोबत संवाद होणे गरजेचे वाटले. मी स्वतःला सुद्धा आधी चेक करणे गरजेचे होते कि मी ह्या गोष्टीसाठी तयार आहे, संगीता मला आवडली असली तरी मी चारूशी प्रतारणा करणार नव्हतो. शिवाय ह्या ठिकाणी वऱ्हाडेंचे चारुबाबतचे मत चारुला अनुकूल नसेल तर काय? हाही प्रश्न होताच. जे होईल ते सर्वानुमते होणे गरजेचे होते.

संध्याकाळी चारू आल्यावर मी तिच्याशी बोलायचे ठरवले.

3.8/5 - (5 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!