विमा पॉलिसीची कथा
माझा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. कामा निमित्त मला सतत बाहेर गावी फिरावे लागते. सतत च्या प्रवासाने कंटाळा तर येतोच पण त्याला काही इलाज नाही. स्वतःची गाडी जरी असली आणि ड्राइवर जरी असला तरी शेवटी प्रवास तो प्रवासच. सततच्या फिरण्याने आणि हायवेला होत असलेल्या अपघाताने मी विचार केला होता कि जर दुर्दैवाने आपल्याला काही झालेच तर आपल्या कुटुंबाचे काय होणार. या साठी मी आधीच माझ्या नावाच्या फार मोठया रकमेच्या विमा पॉलिसी …