भावकी… भाग १
लेखक:- शब्दयात्री पश्चिम महाराष्ट्रातील ते एक सधन गाव होते. द्राक्ष, गाजर अश्या व्यापारी पिकांची लागवड होत असल्याने गावात पैशाची चणचण नव्हती. जिथे पैसा तिथे वाईट गोष्टीही आल्याच. हे गावही त्याला अपवाद नव्हते. गावात दारू, जुगार असे गैरप्रकार वाढीस लागलेले. यातून त्यातील बरेच जण अनैतिक मार्गावर होते.. याच गावात पाच – सहा घरांची छोटीशी भावकी होती. गावात ह्यांची जशी घरं लागून …