भावकी … भाग 3
एका नामांकित सराफाकडून विलासने अनितासाठी मंगळसूत्र बनवून घेतल. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने ते साधच केलं होतं. सायंकाळी ते मंगळसूत्र तो अनिताला घालणार होता. बाजारातून त्यानं तडक मळ्याचा रस्ता धरला. सायंकाळी सगळं सामसूम झाल्यावर अनिता विलासच्या शेडमध्ये गेली. शेवंता बाहेर पाळतीवर थांबली. जांभळ्या रंगाची साडी नेसलेल्या अनिताने काळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता. तिचा गोरा चेहरा उन्हाने रापलेला. त्यातून पण ती उठून दिसत होती. अनिता विलासच्या जवळ येऊन बसली. विलासने …