भूल भाग – २
अगं … काय? पल्लवीने तिला परत एकदा आवाज दिला. तिने ओल्या डोळ्यांनी पल्लवीकडे पहिले. तिच्या डोळ्यांमध्ये अतिशय शरम होती. तिने पल्लवीकडे पाहात तिचा हात हातात घेतला आणि त्यावर डोके ठेऊन रडू लागली. पल्लवी तिच्या बाजूला बसली आणि तिला थोपटू लागली. तिला काहीवेळ दिला शांत होण्यासाठी. डोळे पदरानेच कोरडे करत उर्मीने तिच्याकडं पहिले. “इथे कशी तू?” पल्लवीने विचारले. “मी इथेच राहते. मागच्या वस्तीमध्ये.” उर्मी म्हणाली. पल्लवीला कळले. शाळेच्या मागे एक झोपडपट्टी …