वश भाग ३
गणराजसाहेब स्वतः नरहरी पंडितांची माफी मागायला घरी आले होते. “पंडितजी कसे आहात आपण.” त्यांनी हात जोडत विचारले. “गणराज साहेब मी शांत आणि प्रसन्न आहे, बोला काय सेवा?” नरहरी म्हणाले. “माझ्या मुलाकडून झाल्या प्रकारची मी माफी मागतो. पण तुमचा आशीर्वाद आमच्यावर असावा असेच मला आत्ताही वाटत आहे.” ते प्रांजळपणे म्हणाले. “गणराज साहेब. कुठेतरी खड्डा पडला म्हणजे कुठेतरी ढिगारा हा असतोच. तो निसर्ग नियम आहे आणि त्यामध्ये आपण येऊ नये असे मला …