भावकी… भाग 2
अनिताच आज दिवसभर कामात लक्षच नव्हतं. दिवसभर तिला सायंकाळी काय होणार ह्याची उत्सुकता लागून होती. जेवताना पण तिचं लक्ष नव्हतं. अनिता जेवत नाही हे पाहून तिच्या जवळ बसलेली शेवंता हळूच तिच्या कानात म्हणाली, ” जिवून घे. व्हाईस अंगात बळ राहील.” पण अनिताच्या नरड्यातून घास काही केल्या उतरेना. राहून राहून तिला तीच काळजी लागून राहिलेली. पण आज दिवसभर शेवंताने अनिताची पाठ काय सोडली नव्हती. अनिताला मालकाच्या अंगाखाली घालून तिला मालकाकडून पैसे …