भावकी … भाग 6
दुपारच्या वेळी रामाच्या शेडमध्ये रामा, यशवंत, बजरंग आणि अनिता जमा झालीत. चर्चेला रामानेच सुरुवात केली. रामा – ” बरं यशवंत अन् बजरंगा, वैनींची अशी तक्रार हाय की, त्यांच्या वाटला जमीन कमी आलीया. त्यांची अशी ईच्छा हाय की तुमी जरा त्यांना सरकून जागा द्यावी. म्हंजी समद्याना समान जागा मिळतीया.” यशवंत ( तिरकस नजरेने अनिताकडे पाहत ) – ” पण ते नव्हं रामा काका, काकिंबद्दल इतका आपलेपणा दावायला काकी कुठं अमाला धरून …