ब्लॅक इन गोवा भाग- ३
नेहाचे परिश्रम सर्व वाया गेले. ट्रकवाला अंधारात कुठे गायब झाला ते कळलेच नाही. शेवटी वैतागून नेहाने गाडी हॉटेलच्या दिशेने वळवली. हॉटेल राजहंसच्या गेट मधून एंटायसर आत घुसुन पार्किंग लॉट मध्ये पार्क झाली. “नेहा, जाऊ दे ना.. कुठे त्या ट्रकवाल्याला शोधत बसणार” केतकीने गाडी वरून उतरत सॅक पाठीला लटकवली. “नाही.. मी त्याला सोडणार नाही. नेहा अजून चिडलीच होती. “बरं..तो भेटल्यावर बघु आपण, आधी चेक-इन तर करून घेऊ. केतकी आणि नेहा रेसिप्शन …