दृष्ट लागण्याजोगे सारे…
उसंड्या घेण्यास सदोदित उत्सुक अशा तिच्या मनाला सावर गं… म्हणावं असं कधीचं वाटलं नाही. कारण तिचं ते बिनधास्त वावरण, मनमोकळं बोलणं आणि शुल्लक कारणावर हलकसं हसणं हेच तिच्या सौदर्याचं खरं गुपित होत. पण म्हणतात ना ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ ही म्हण तिला अचूक लागू व्हायची. या परीचं हम दो हमारे दो… असं इनमिन चार माणसांच कुटुंब. इतर नातेवाईक …