मास्तर भाग 2
“योग्या .. अरे मला तहसिलातून जे पत्र हवं आहे ते मिळालय. पण त्यावर सही शिक्का द्यायला तहसीलदार जागेवर कुठाय…?” मामा योगेशला एका सकाळी सांगत होते.“मग? काय करायचे आता?” योगेशने विचारले.“तेच तुला सांगतोय. तहसीलदारांच्या गावाला जायला लागेल. कारण ते आहेत सुट्टीवर. मी माहिती काढली आहे. त्यांच्या गावीच माझा एक मित्र आहे. त्याला सोबत घेऊन गेलो तर लगेच सही मिळेल. पण कसंय …