ब्लॅक इन गोवा भाग- ४
गोवा का इतका आवडतो? ह्याचे उत्तर शोधायची गरज नाही. ते आपोआप आपल्याला सापडते. इथला निसर्ग, इथलं साधसुधं जीवन, शहरातील गोंगाटा पासून दूर अशा शांत वातावरणात कोणाला नाही आवडणार. गोव्याच्या दोन बाजू आहेत. समुद्रकिनारी जल्लोषाचं वातावरण तर इथल्या ग्रामीण भागात रुजलेलं शांत निवांतपण. दोन्ही भागातील समाजजीवन अतिशय भिन्न आहे. पण या दोन्हीचा समतोल इथल्या नागरिकांनी राखलाय. नेहा आणि केतकी यांना हे गावपण अगदी नाविन्यपूर्ण वाटत होतं. गावे असले तरी गोव्याने पाश्चिमात्य …