भूल भाग – १
“आय एम सो सॉरी… मी खूप चुकलो… असा अविचारीपणा तुझ्याबाबतीत मी केला. मला खरेच माफ कर.” निखिल ईशाला विनवत होता. “इशू.. निखिल आणि आम्हालाही खूप लाजिरवाणे वाटत आहे ग. प्लिज तू आता राग सोड आणि आपल्या पिल्लूला घेऊन घरी चल.” तिच्या सासूबाई मंदाताई सुद्धा तिला विनंती करत म्हणाल्या. “इशा ! आता हट्ट सोड बाळा. आयुष्य समज आणि गैरसमजांनी भरलेले आहे. म्हणून आपण आपल्या माणसांना असं दूर करायचे नसते. निखिलना त्यांची …