गाव_तसं_चांगलं…भाग २
आज विजयाचा कामावर पहिला दिवस. सकाळपासून तिची लगबग चालु होती. वक्तशीरपणा हा तिचा पेशाच होता. शेवटी एका पोलिस अधिकाऱ्याची बायको. मुलांचे डबे बनवून ज्याची त्याची तिने रवानगी केली. आता तिने स्वतःचे आवरायला घेतले. आज ती एका नव्या उमेदीने तयार होत होती. पांढऱ्या रंगाची साडी, तिला सोनेरी काट, त्याच रंगाचा ब्लाऊज, कपाळावर अगदीच बारीक काळी टिकली, गळा अगदीच मोकळा वाटू नये …