अनलॉक १.०
अनघाचे हात खूपच फास्ट चालत होते. भरभर स्वयंपाक आटपत तिने डबा भरला. तिचा नवरा अमोल मुलाला अंघोळ घालत होता. तो वर्क फ्रॉम होम होता म्हणून अनघाला त्याची खूपच मदत होती. स्वयंपाक मात्र ती स्वतः करत असे. तिला त्यामध्ये आवड आणि स्पीड दोन्ही होते. आजपासून तिला ऑफिस जॉईन करायचे होते. २-३ महिन्यांच्या कोव्हिडच्या लॉक डाऊन नंतर तिचा नंबर पहिला होता. तसे ऑफिसमध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामे होती. मूळ काम मुलींना शिकवण्याचे होते. …