ब्लॅक इन गोवा भाग- ६
गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. नेहा हा नवखा प्रदेश सारं काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहळत होती. इन्स्पेक्टर चारूशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. केतकी मात्र शून्यात नजर हरवुन बसली होती. “चल, उतर गाडीतून. ” दरडावण्याने ती भानावर आली. निमूटपणे उतरून ती नेहा शेजारी थांबली. नेहाने तिचा हात आपल्या हातात घट्ट दाबुन धरला. आणि डोळ्यात विश्वासाने पाहिले. …