फुलांना गंध मातीचा- भाग – ४
दोन आठवडे हा प्रकार सुरू होता. सचिन आणि राहुल रोज नाश्ता करून स्टेशनवर एकत्र जायचे. मग संध्याकाळी सहा-सातच्या सुमारास कधी दोघे एकत्र परत यायचे आणि कधी राहुल एकटाच परत यायचा. सचिन जेव्हा राहुल सोबत परत यायचा तेव्हाही काही काळानंतर तो पुन्हा दारू प्यायला बाहेर जायचा आणि रात्री उशिरा दारूच्या नशेत परतायचा. राहुल बहुतेक संध्याकाळ वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत किंवा गच्चीवर घालवत असे. अमिता त्याला वरच्या मजल्यावर जेवण देत असे. राहुल …