व्हिक्स चोळू का?
शहरातील फ्याट संस्कृतीत सतत प्रत्येक वर्षा दोन वर्षाने घर बदलावे लागते दोन तीन महिने झाले नवीन बिल्डिंग मध्ये रहावयास आलो होतो बिल्डिंग तशी जुनीच होती परंतु हवेशीर होती चार मजली इमारतीत चौथ्या मजल्यावर आम्ही रहावयास आलो होतो तेथे अगोदरच एक कुटुंब रहात होते. आमची थोडी ओळख झाली होती समोरच रहावयास असल्याने व वरती कोणी नसल्याने समोरच्या वहिनी आमच्या घरी अधून मधून येत असत एक दिवस माझ्या बायकोच्या माहेरी अचानक जावे …