‘चाबऱ्या’ भाग १
” दादा कवा येत्याल गं आये? “ अचानक आलेला लहान मुलाचा प्रश्नार्थक आवाज, अंगणातल्या बदामाला आपसुक टेकुन विश्रांती घेत असलेल्या गोदावरीची तंद्री भंग करतो. क्षणात तिची नजर तुराट्यांनी बनवलेल्या फाटकाकडं जाते. ” चाबऱ्या.. ! तु हाय व्हय रं..? आनं आत ई की… उन्हा तान्हाचं कमुन फिरायलास बरं.” ” आये.. शाळत गेलतो गं… येतानी पाय शेणावर पडून चप्पल घसरली.. तुटली..” चाबऱ्या …